शिवलीलामृत ह्या प्राकृत प्रासादिक पोथीचे लेखन श्रीधर स्वामी ह्यांनी केले. आधी व्याधी निरसन, संतती, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, आरोग्य ग्रंथ श्रवण पारायण ह्याने प्राप्त होऊ शकत अस खूप मोठा अध्यात्मिक अधिकार असलेल्या श्रीधर स्वामी महाराजांनी म्हटले आहे. देवाधीदेव महादेवाचे चरित्रातील काही मौल्यवान रत्ने स्वामिनी अश्या पद्धतीने १ ते १४ अध्यायात मांडले आहेत कि ग्रंथच्या वाचनाने ऋणमोचन, दक्षिणे कडे तोंड करून वाचलयास ज्ञात अज्ञात शत्रू पासून रक्षण भगवान शिव करतात.
जो शिव लीलामृत पोथीची शंभर आवर्तन करतो त्याला शिवभक्त पुत्र होईल. भूत प्रेत पिशाच बाधा ह्या पासून संरक्षण ह्या ग्रंथाने होते. साधारण तीन महिन्यात नित्य पारायण केल्याने देवाधिदेव महादेवाच्या कृपेचा अनुभव आल्याशिवाय रहाणार नाही.
शिव प्रदोष, शिवरात्र ह्या काळी शुचिर्भूत होऊन (स्नान इ०) वाचन केल्यास आपल्या वैयक्तिक जीवनातील अडचणी तून काहीतरी मार्ग हा निघतो, सूचक स्वप्न दृष्टांत ह्यातून मार्गदर्शन होतेच. कुष्टरोग, गंडांतर, रोग इ० ताप जातात
ज्यांना वेळे अभावी नित्य एक अध्याय वाचणे शक्य नसेल त्यांचे करता श्रीधरस्वामी नी नित्य पाठच्या बेचाळीस ओव्या दिलेल्या आहेत त्या त्यांनी वाचाव्यात. त्या शिवमंदिरात , देवघरात , श्री स्वामीसमर्थ महाराजांचे फोटो समोर किंवा आपल्या आवडत्या देवी देवतेच्या फोटो समोर वाचता येतील. ज्याची आवडती देवता जर महादेव असेल त्यांच्या करता तर ह्या सारखी सुंदर सेवा नाही. सध्याच्या धावपळी च्या काळायावेतत पटकन शिव उपासने साठी नित्य पाठच्या बेचाळीस ओव्यांचा समवेश देखील ह्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपेने केला आहे, भाविक अन् साधक यांना नक्कीच लाभ देणारा होईल.
रामदास स्वामिनी रचलेली शंकराची आरती
शिव अष्टोत्तर शत नामावली समावेश भगवान शिव ह्यांना १०८ बिल्वदल अपर्ण करण्या करता केला आहे. हे छोटेसे पुष्प स्वामी चरणी समर्पित.
शिवलीलामृत ह्या प्राकृत प्रासादिक पोथीचे लेखन श्रीधर स्वामी ह्यांनी केले. आधी व्याधी निरसन, संतती, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, आरोग्य ग्रंथ श्रवण पारायण ह्याने प्राप्त होऊ शकत अस खूप मोठा अध्यात्मिक अधिकार असलेल्या श्रीधर स्वामी महाराजांनी म्हटले आहे. देवाधीदेव महादेवाचे चरित्रातील काही मौल्यवान रत्ने स्वामिनी १ ते १४ अध्यायात मांडले आहेत