"पोलीस'' हाही एक माणूसच आहे, हे आपण बहुतेक वेळा विसरून जातो. कामाच्या जबाबदार्या पार पाडताना अनेक संकटं त्याच्यासमोर येत असतात. अनेक मोहाचे क्षण गुंगवून टाकतात. राजकारणी, समाजातले प्रतिष्ठित, श्रीमंत यांच्यापुढे अनेकदा लाचारी पत्करावी लागते.गुन्हा, गुन्हेगार, सामान्य जनता यांच्यामधे काम करताना मन अस्वस्थ करणाऱ्या अनेक घटना घडतात. गुन्हेगार माहीत असूनही त्याला करणं क्य होत नाही तेव्हा उद्वेग होतो.पण या तमाम अडचणीतूनही आपल्या कर्तव्याचं सतत भान ठेवून त्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करत राहणार्या एका पोलीस अधिकार्याचा हा अनुभवपट!
Beletristika i književnost