विश्वास पाटील यांनी साहित्य, इतिहास, नाट्य, संगीत, सिनेमा या अंगांनी लिहिलेले ललितलेख ’बंदा रुपाया!’ या संग्रहात समाविष्ट केले आहेत. मराठ्यांचा वैभवशाली इतिहास, ठसकेबाज लावणीची परंपरा, चित्रपट त्यातील तारे तारकांचे ’ग्लॅमरस’ त्याचबरोबर वैयक्तिक जीवन, साहित्यक्षेत्रात आपल्या अपूर्व कामगिरीने वेगळा ठसा उमटवणारे साहित्यिक, संगीत, नाट्य क्षेत्रातील मातब्बर असे अनेक विषय ’बंदा रुपाया!’मध्ये विश्वास पाटील यांनी हाताळले आहेत. साहित्य, इतिहास, नाट्य, संगीत, सिनेमा यांचा गाढा अभ्यास हे या लेखसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.