जय शेट्टी हे स्टोरीटेलर, पॉडकास्टर आणि पूर्वाश्रमीचे संन्यासी आहेत. व्हायरल मार्गाने विद्वत्तेचा सर्वांपर्यंत सर्वदूर प्रसार करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. प्रसारमाध्यमांच्या जगाला कलाटणी देणार्या लोकांच्या फोर्ब्जच्या यादीत, 2017मध्ये ‘फोर्ब्ज थर्टी अंडर थर्टी’मध्ये त्यांचा समावेश झाला होता. सहज उपलब्ध होणार्या, प्रसंगोचित आणि व्यवहार्य मार्गाने जगाची कालातीत विद्वत्ता सर्वांना सांगण्याची, तिचा प्रसार करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. शेट्टींनी 400हून अधिक व्हायरल व्हिडिओंची निर्मिती केली आहे आणि त्याला 5 अब्जांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ऑन पर्पज या जगभरातील #1 ‘हेल्थ अॅरन्ड वेलनेस पॉडकास्ट’चे ते सूत्रसंचालनही करतात.