आपली जन्मभूमी सोडून परक्या मुलखात रुजू पाहणारी असंख्य माणसं...ही कादंबरी अशा माणसांचं प्रतिनिधित्व करते. तसलिमा यांनी स्वतः ते जगणं जवळून अनुभवलं आहे. त्यांच्या जगप्रसिद्ध ‘लज्जा' कादंबरीसाठी त्यांना कट्टरपंथीयांनी देश सोडायला लावला. या कादंबरीत त्यांनी अशाच आपल्या मुळांपासून उखडलेल्या जीवनाची मार्मिक आणि विचारोत्तेजक गोष्ट सांगितली आहे. ही कादंबरी ‘लज्जा'सारखी राजकीय नाही, तर ती स्थलांतरातली अपरिहार्यता आणि वास्तव अधोरेखित करते. कादंबरीतील सर्व पात्रं सांप्रदायिक कलह आणि अत्याचारांमुळे स्वतःचं घर सोडावं लागलेल्या पीडितांचं, परक्या मुलखात जगण्याची कसरत करणाऱ्या माणसांचं प्रतिनिधित्व करतात.
Taslima Nasreen, an award-winning writer, physician, secular humanist and human rights activist, is known for her powerful writings on women oppression and unflinching criticism of religion, despite forced exile and multiple fatwas calling for her death. In India, Bangladesh and abroad, Nasreen’s fiction, nonfiction, poetry and memoir have topped the best-seller’s list. Taslima Nasreen was born in Bangladesh. She started writing when she was 13. Her writings won the hearts of people across the border and she landed with the prestigious literary award Ananda from India in 1992, The Sakharov Prize for Freedom of Thought from the European Parliament in 1994 & many more such awards. Taslima has written 40 books in Bengali, which includes poetry, essays, novels and autobiography series.
तसलिमा नासरिन यांचा जन्म २५ ऑगस्ट, १९६२ मध्ये बांगलादेशातील मयमनसिंग येथे झाला. त्यांनी मयमनसिंग मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. ही पदवी घेतल्यानंतर काही वर्षे सरकारी डॉक्टर म्हणून काम केले. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात कवितांनी झाली, पण लज्जा या कादंबरीने त्यांना साहित्य वर्तुळात खऱ्या अर्थाने नावाजलं गेलं. त्यांच्या नावावर चाळीस पुस्तके जमा आहेत. १९९२ सालच्या आनंद पुरस्कारासह त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Manjiri Dhamankar is an anchor with experience of almost 28 yrs. She has anchored shows of almost all stalwarts in classical music and dance, also film music, gazals, etc. She is trained in classical music & presented more than 700 shows of ekpatri prayog ' Charpatmanjiri in India and abroad. She authored 5 books & translated 12 books from or into Sanskrit, Marathi, Urdu, Hindi, English and Bangla. She is recipient of Sahitya parishad award, Balgandhandharva pariwar award & many more.
मंजिरी धामणकर मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत उर्दू व बंगाली भाषा अवगत असलेल्या निवेदिका आहेत. त्यांच्या चर्पटमंजिरी या एकपात्री कार्यक्रमाचे देश विदेशात शेकडो प्रयोग झाले आहेत. त्यांची पाच स्वलिखित पुस्तके तर बारा अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, नाट्य परिषद पुरस्कार, भालबा केळकर पुरस्कार, बालगंधर्व परिवार पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संस्कृत श्लोकांच्या हिंदी मराठी इंग्रजी भाषांतरासाठी त्यांची लिम्का बुक मध्ये नोंद झाली आहे.