ताणतणाव म्हणजे आयुष्यातील विविध घडामोडींमुळे झालेली माणसाच्या शरीराची आणि मनाची झीज. त्यामुळेच त्याच्यात भीती, गोंधळ, नैराश्य, तणाव यांसारख्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून अशा बिकट स्थितीत तो पार कोलमडून जातो. कधी कधी तर तणावपूर्ण विचारात अडकून माणूस आपली इच्छादेखील गमावून बसतो. माणसाने आपल्या शरीरावर, जीवनावर वाहनचालकासारखं नियंत्रण ठेवलं, सकारात्मक विचार ठेवले तर तो त्वरित ताणतणावातून मुक्त होऊ शकतो. यासाठी आपल्याला हे पुस्तक निश्चितच मदत करेल.