क्वचितच मिळती मोती अंतरी पहावया आगळे
परी एक स्थळ आहे जगती अगदी जगावेगळे
'त्रिवेनीता' या दो सरितांनी सस्नेह निर्मियले
रंग, रूप, वय, जात-धर्म ना कसलेच इथे बंधन
सारेच 'शब्दसम्राट' इथे करिती सदैव मंथन
हे शब्दतरू अन कवनपुष्प करतील तुमचे रंजन
प्रिय वाचकहो, करा येथ मधुमक्षिकेसम गुंजन
तव मनोमनी मग पेटतील साहित्य स्फुरण-ज्योती
स्मरतील तेव्हा केवळ 'शिंपल्यातले शब्दमोती'