वैदर्भीय साहित्यिक-कवी- लेखक वामनराव चोरघडे, पुरुषोत्तम दारव्हेकर, खुद्द अमरावतीचे असणारे कविवर्य सुरेश भट आणि मधुकर केंचे त्याचबरोबर नागपूरचे प्राचार्य राम शेवाळकर इत्यादी मान्यवरांच्या लेखणीची सहज आठवण व्हावी आणि उमा कन्नडकर आणि मानसी कविमंडन यांच्या मनात महम भी कुछ कम नहींफ, अशी भावना प्रकट व्हावी, या स्वरूपाचा हा काव्यसंग्रह झालेला आहे. या मराठी काव्यसंग्रहात या मायलेकींच्या काही इंग्रजी कवितांचाही समावेश केला आहे. एकंदर ८४ कवितांच्या संग्रहात ६९ मराठी आणि १५ इंग्रजी कविता आहेत. यापैकी पहिल्या २३ कविता या उमा कन्नडकर- म्हणजे आईच्या आहेत आणि मबाबाफ या कवितेपासून इंग्रजी कवितांसह इतर सार्या कविता लेकीच्या आहेत.