डॉक्टर जोनाथन रॅन्सम आणि त्याची लावण्यवती पत्नी एम्मा, गिर्यारोहण करण्यासाठी आल्प्स पर्वतात गेलेले असतात. अचानक आलेल्या एका हिमवादळात ते दोघेही सापडतात; आणि त्यात एम्माचा मृत्यू होतो...एम्माच्या मृत्यूनंतर जोनाथनच्या हातात एक पाकीट पडते. त्यात त्याला एम्माने इतके वर्षे त्याच्यापासून दडवून ठेवलेले, एक महाभयानक सत्य कळते...ते सत्य म्हणजे; अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची, आंतरराष्ट्रीय दहशतवादाची व गुप्तहेरांची गुन्हेगारी दुनिया – अशी दुनिया की, जिथे प्रत्येक चेहNयाआड आणखी एक चेहरा लपलेला असतो. जिथे फक्त साध्य महत्त्वाचे असते, साधनांबद्दल कसलाही विधिनिषेध नसतो!