ROBIN COOK IS A GRADUATE OF WESLEYAN UNIVERSITY AND COLUMBIA UNIVERSITY SCHOOL OF MEDICINE. HE COMPLETED HIS POSTGRADUATE MEDICAL TRAINING AT HARVARD. WITH HIS WIFE AND SON, HE ALTERNATES BETWEEN BOSTON, NAPLES AND FLORIDA. HIS SUCCESSFUL COMBINATION OF MEDICAL TRUTH AND HIS OWN IMAGINATION HAS CREATED A CHAIN OF BOOKS IN RECORD DEMAND.
रॉबिन कुक हे वेस्लेयन विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेचे पदवीधर आहेत. हार्वर्डमध्ये त्यांनी आपले पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या पत्नी व मुलासह ते आलटून पालटून बोस्टन, नेपल्स आणि फ्लोरिडामध्ये असतात. वैद्यकीय सत्य आणि स्वत:ची कल्पनाशक्ती यांच्या यशस्वी संयोगाने त्यांनी विक्रमी मागणी असलेल्या पुस्तकांची एक साखळीच निर्माण केली आहे. त्यांच्या वैद्यकीय रोमांचकथा, वैद्यकशास्त्रातील संभाव्य तांत्रिक गोष्टी आणि नैतिक प्रश्न यांची जाणीव करून देण्यासाठी आहेत. कुक हे वुड्रो विल्सन सेंटर च्या विश्वस्त मंडळातील खासगी सदस्य आहेत. या सदस्यांची नेमणूक सहा वर्षांसाठी अमेरिकेचे अध्यक्ष करतात. आजपर्यंत त्यांनी अवयवदान, जैवअभियांत्रिकी जननक्षमतेवर उपाय, संशोधनासाठी अनुदान, नियोजित संगोपन, वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार, औषध संशोधन, अवयव रोपण इत्यादी विषयांचा वेध घेतला आहे. त्यांच्या कादंबऱ्यानी देशात चर्चेची वादळे उठतात. स्टेम सेल सारख्या लोकांना अपरिचित विषयांवरही त्यांनी लिहिले आहे. वाचकांचे रंजन करण्याबरोबरच अशा विषयांबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणे आणि त्यातल्या नैतिक समस्यांची जाणीव निर्माण करणे हा त्यांच्या कादंबऱ्यामागचा उद्देश आहे. आपल्या पुस्तकांच्या लोकप्रियतेचे रहस्य सांगताना ते म्हणतात, मुख्य कारण म्हणजे, आपल्याला लक्षात येतं की, आपण सगळेच असुरक्षित आहोत. कधी ना कधी आपण सगळेच पेशंट असणार आहोत.
A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House Pvt Ltd has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House Pvt Ltd to become the leaders in Marathi publishing in India today.
डॉ. अजेय हर्डीकर गेली बावीस वर्षे पुण्यातील एका नामवंत कंपनीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सुमारे पंधरा वर्षांपासून ते चित्रकला आणि निसर्ग-विषयक पुस्तकांचे अनुवाद (इंग्रजी–मराठी आणि मराठी-इंग्रजी), तथा संपादन करत आहेत. या खेरीज निसर्ग विषयक रेखाटने करणे, छायाचित्रण, पक्षीनिरीक्षण, आणि वाचनात त्यांना विशेष रस आहे.