केन ब्लँचर्ड जगातील सर्वांत प्रभावशाली नेतृत्वतज्ज्ञांपैकी एक असून, द वन मिनिट मॅनेजर या बेस्ट सेलर पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. व्यवस्थापन, नेतृत्व आणि वक्तृत्व या क्षेत्रांतील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
क्लेयर डियाझ-ऑर्टिझ या लेखिका, वक्त्या आणि तंत्रज्ञान अन्वेषक आहेत. ट्वीटरच्या सुरुवातीच्या काळात कर्मचारी म्हणून त्या साडेपाच वर्षं कार्यरत होत्या. क्लेयर या सोशल मीडिया, व्यवसाय, अन्वेषण या विषयांवरील आंतरराष्ट्रीय व्याख्यात्या आहेत.