गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयातील एडमंड कर्षचं एक रहस्यमय प्रात्यक्षिक...प्रात्यक्षिकात, निमंत्रितांच्या उपस्थितीत, तो सांगणार असतो मानवाच्या उत्पत्तीसंबंधी आणि मानवाच्या भविष्याविषयी लावलेला शोध... पण तो सांगण्याआधीच कार्यक्रमस्थळी होते त्याची हत्या... हल्लेखोराचं पलायन... तो असतो नौदलातील माजी अधिकारी... कर्षचे गुरू रॉबर्ट लँग्डन आणि वस्तुसंग्रहालयाची मुख्याधिकारी अॅम्ब्रा व्हिडाल (जी स्पेनचे भावी राजे ज्युलियन यांची वाग्दत्त वधू असते) कर्षचा हा शोध जगासमोर आणायचा बांधतात चंग... पण त्यासाठी कर्षच्या महासंगणकाचा पासवर्ड आणि त्या महासंगणकाची जागा शोधण्याचं त्यांच्यासमोर असतं आव्हान... अॅम्ब्राचे सुरक्षारक्षक आणि पोलीस यांचा त्यांच्या मागे असतो ससेमिरा... कर्षच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजवाड्यातून ज्युलियन आणि बिशप वाल्डेस्पिनो गूढ रीतीने गायब होतात...एक जबरदस्त गुंतागुंतीची, उत्कंठावर्धक कादंबरी...
डॅन ब्राऊन
जन्म : २२ जून, १९६४
`एन्जल्स अॅण्ड डेमन्स', `डिसेप्शन पॉर्इंट' आणि ‘द दा विंची कोड’ अशा अनेक बेस्टसेलर कादंबऱ्यांचे लेखक म्हणून डॅन ब्राऊन जगभरात प्रसिद्ध आहेत.
`टाइम मॅगझीन'ने जगातील शंभर सर्वांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक असा त्यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचे ५१हून अधिक भाषांत अनुवाद झाले आहेत. `अॅमहर्स्ट कॉलेज अॅण्ड एक्झिटर अॅकॅडमी'मधून त्यांनी पदवी संपादन केली आणि तेथेच इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
Dan Brown is the author of The Da Vinci Code. One of the most widely read books of all time, as well as three other bestsellers featuring Harvard symbologist Robert Langdon : Inferno, The Lost Symbol and Angels and Demons. He has also written two internatonally acclaimed stand-alone thrillers, Deception Point and Digital Fortress.
Mohan G.Gokhale is B.Sc.LLB &D.B.M. After working in one of the nationalised Banks for 39 years, he retired as a Chief Manager from the Bank. He is an avid reader and prolific translator.He has his personal collection of about more than one thousand five hundred books.
His collection of books includes, besides Marathi, English literature, books on various subjects such as,travelogues from earlier eras, south/north poles, Himalayan explorations'/expeditions' accounts,books on World Wars 1&2,History,Geography,map making,Science and critical essays on political, social and religious issues.
As a natural progression, his voracious reading inspired him to try his hand at writing and translating English books. His journey from enthusiastic and inquisitive reader to writer/translator of some standing has been rewarding and fulfilling.
मोहन गोविंद गोखले यांनी बी.एस्सी. एलएल.बी.य डीबीए पदवी प्राप्त केली असून त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत ३९ वर्षे नोकरी केली. चीफ मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले गोखले यांनी वाचन-लिखाणाची आवड निग्रहाने जोपासली. त्यांच्या ग्रंथसंग्रहात इंग्रजी-मराठी अशी दीड हजारांहून अधिक पुस्तके आहेत.
ललित साहित्याबरोबरच दोशेदेशींची प्रवासवर्णने, उत्तर-दक्षिण ध्रुव, जगातील पर्वतशिखरे, वाळवंटे, समुद्र, नद्या यांवरील धाडसी मोहिमांवरील पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत.
पहिले / दुसरे महायुद्ध, युद्धविषयक अनेक पुस्तके त्यांच्याकडे आहेत. ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक अश विविध विषयांवरील विपुल ग्रंथसंपदा त्यांनी रसिकतेने जोपासली आहे. विविधांगी वाचनाच्या चिंतन-मननातून त्यांना स्वतंत्रपणे लिहिण्याची प्रंरणा मिळाली. जिज्ञासू वाचक ते स्वतःच्या लेखनशैलीत लिहिणारा लेखक असाच त्यांचा साहित्यप्रवास आहे.