सच्चा
आवाज.बालपणाच्या धास्तीभरल्या आठवणी जाग्या करता करता उदात्ततेला आवाहन
करणारा आणि वास्तवापुढे मान तुकावणाऱ्या निरागसतेची वेदना टिपणारा सच्चा
आवाज! सोफी लगूनानं रेखाटलेलं जग, व्यक्तिरेखा आणि व्यक्तिरेखेला साजेशी
भाषा,यात वाचक गुंगून जातो. हे सारं एका दारुण वास्तवाच्या कथानकाला
हाताळताना,एवढ्या तीव्र आणि प्रभावशाली शैलीत ती करू शकली आहे, हीच तिच्या
ठायीच्या चातुर्य, कलाकौशल्य आणि परिपक्वता या गुणांना मिळालेली पावती
म्हटली पाहिजे. भडक पत्रकारितेच्या हे सर्वस्वी विरुद्ध आहे. हे माणुसकी,
मनोविकार आणि सत्य यांनी ओतप्रोत भरलेलं आहे.