मिलिंद एस. शेंडे हे गो. से. वाणिज्य महाविद्यालय, वर्धा (महाराष्ट्र) येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून मागील आठ वर्षांपेक्षा अधिक काळापासून कार्यरत आहेत. त्यांचं विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके इत्यादींमध्ये इंग्रजी तसेच मराठी भाषेत लेखन प्रसिद्ध असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या ज्ञानपत्रिका, नियतकालिकांमध्ये मध्ये 27 पेक्षा अधिक संशोधन लेख प्रसिद्ध केले आहेत. नागपुर येथून प्रकाशित होत असलेल्या ‘धम्मघोष’ या मासिकेच्या 2020 च्या युवकांवर आधारित विशेष आवृत्तीचे अतिथि संपादकपद त्यांनी भूषविले. ते सामाजिक कार्यात देखील कार्यरत असून त्याचाच एक भाग म्हणून 2020 मध्ये जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पॅनल सदस्य म्हणून देखील सहभागी झाले होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसोबत सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी असतात