Mahapurushanchi Jeevangatha (Marathi): Aavishkar 12 Shakticha

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4.4
20 રિવ્યૂ
ઇ-પુસ્તક
208
પેજ
રેટિંગ અને રિવ્યૂ ચકાસેલા નથી વધુ જાણો

આ ઇ-પુસ્તક વિશે

साद देती यशशिखरे

पृथ्वीवरील मनुष्याच्या अस्तित्वाचं मुलभूत कारण म्हणजे स्वतःला जाणणं, स्वानुभव प्राप्त करणं. खरंतर हा अनुभव शब्दातीत असून, त्याला ना कोणता बाह्य आकार देता येतो, ना कोणतं शब्दरूप! पण तो प्राप्त करण्याची प्रेरणा मात्र निश्‍चितच जागृत करता येते. वाचकांना या सर्वोच्च आनंदाची, स्वानुभवाची झलक मिळावी, हाच प्रस्तुत पुस्तकाचा मूळ उद्देश! याच कारणास्तव प्रस्तुत पुस्तकात महापुरुषांच्या जीवनातील उद्बोधक कथांवर प्रकाश टाकण्यात आला असून, त्यांच्या माध्यमातून १२ शक्तींचा आविष्कारही शब्दबद्ध करण्यात आलाय. शिवाय महापुरुषांच्या असामान्य कार्याचा वेधही घेण्यात आलाय.

महापुरुषांचं जीवनकार्य म्हणजे प्रत्येक मनुष्याला साद घालणारं यशाचं शिखर. या यशोशिखरावर आरूढ होण्यासाठी गरज आहे, अंतःप्रेरणा जागृत करण्याची, महापुरुषांच्या जीवनाचा मागोवा घेण्याची आणि हा मागोवा घेताना प्राप्त होणारा बोध जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणण्याची. तुम्ही यशोशिखरावर विराजमान होण्यासाठी तयार असाल, तर या मार्गातील संभाव्य अडथळे पार करण्यासाठी महापुरुषांची जीवनगाथा तुम्हाला अचूक मार्गदर्शन करेल. मग तुमचं जीवनही महाजीवन बनेल.

રેટિંગ અને રિવ્યૂ

4.4
20 રિવ્યૂ

લેખક વિશે

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

આ ઇ-પુસ્તકને રેટિંગ આપો

તમે શું વિચારો છો અમને જણાવો.

માહિતી વાંચવી

સ્માર્ટફોન અને ટૅબ્લેટ
Android અને iPad/iPhone માટે Google Play Books ઍપ ઇન્સ્ટૉલ કરો. તે તમારા એકાઉન્ટ સાથે ઑટોમૅટિક રીતે સિંક થાય છે અને તમને જ્યાં પણ હો ત્યાં તમને ઑનલાઇન અથવા ઑફલાઇન વાંચવાની મંજૂરી આપે છે.
લૅપટૉપ અને કમ્પ્યુટર
Google Play પર ખરીદેલ ઑડિઓબુકને તમે તમારા કમ્પ્યુટરના વેબ બ્રાઉઝરનો ઉપયોગ કરીને સાંભળી શકો છો.
eReaders અને અન્ય ડિવાઇસ
Kobo ઇ-રીડર જેવા ઇ-ઇંક ડિવાઇસ પર વાંચવા માટે, તમારે ફાઇલને ડાઉનલોડ કરીને તમારા ડિવાઇસ પર ટ્રાન્સફર કરવાની જરૂર પડશે. સપોર્ટેડ ઇ-રીડર પર ફાઇલો ટ્રાન્સ્ફર કરવા માટે સહાયતા કેન્દ્રની વિગતવાર સૂચનાઓ અનુસરો.