Though Mahadev More has written diverse writings that incorporate literary, rural, dalit, and urban literature, the true cast of their pen is in the life of the exploitation of the exploited animals in the bottom of the society. In Marathi literature, many years before the change of the word 'Dalit literature', they have put shock absorbers in white pathetic sensitivity. Without the shallowness of the scattered people, the depressed people and their grievances, they have revealed their literary activity. He has proved to be the author of his penchant, in a comic, Mixedhealth style as a serious writer. It is a pleasant affair with these mythical stories that they are taking a great look at the primitive attitude of men. His new twist in the 'Matter' story must be heard by readers. गेली ४७ वर्षे सातत्याने ललित लेखन करीत असलेल्या, उपेक्षित निपाणी सीमा भागातील माणसे व परिसर मराठी साहित्यात अजरामर करून आपल्या गावचा लौकिक गगनावरी नेलेल्या श्री. महादेव मोरे यांच्या ह्या नव्या कथासंग्रहात ९४ ते ०५ सालापर्यंत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या कथांचा समावेश आहे. ग्रामीण, दलित, नागर आदी वाङ्मय प्रकारांना सामावून घेणारे वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केले असले तरी त्यांच्या लेखणीचा खरा ओढा समाजाच्या तळाच्या थरातील भरडल्या जाणाऱ्या शोषितांचे जीवन चित्रण करण्याकडे आहे. मराठी साहित्यात ‘दलित साहित्य’ हा शब्दप्रयोग रूढ होण्याच्या कितीतरी वर्षे आधीपासून श्री. अण्णाभाऊ साठे, प्रा. डॉ. शंकरराव खरात, श्री. नारायण सुर्वे आदींच्या बरोबरीने विविध नियतकालिकांतून शोषितांची दु:खे पांढरपेशी संवेदनशीलतेला धक्का देत त्यांनी मांडली आहेत. पांढरपेशी परिघाबाहेर जगणाऱ्या किती एक मानव समूहाला शारदेच्या दरबारात आणण्याचे काम त्यांनी ताकदीने केले आहे. पिचलेली, खचलेली माणसे व समाजव्यवस्थेतून आलेले त्यांचे दु:खभोग कुठेही उथळपणा न आणता उत्कट संवेदनशीलतेतून त्यांनी आपल्या साहित्य कृतीतून प्रकट केले आहे. गंभीर लेखनाप्रमाणे गंमतीदार, मिश्कील लेखनातही त्यांनी आपल्या लेखणीची हुकमत सिद्ध केली आहे. आपल्या ह्या मिश्कील कथांद्वारे ते माणसातील आदिम वृत्ती-प्रवृत्तींचा मनोज्ञ वेध घेत असल्याचा सुखद प्रत्यय येतो. त्यांची लेखनशैली खास त्यांची स्वत:ची असून तीवर पूर्वसुरींच्या, तसेच त्यांच्या समकालीन कुठल्याही साहित्यिकाची छाप नाही. शेतमजूर, मोटार मेवॅâनिक, टॅक्सी ड्रायव्हर असं विविध पातळ्यांवरील जीणं जगत त्यांनी काही वर्षे मिरची पूड तयार करण्याच्या मशीनवरही काम केलं आहे. सत्तरी जवळ आली तरी वृद्ध साहित्यिकांना दिल्या जाणाNया सरकारी सन्मानधनाकडे पाठ फिरवून पिठाच्या गिरणीत राबणाऱ्या कामगाराचे आयुष्य सन्मानाने जगत मराठीतील कुणा साहित्यिकाला अभावानेच आले असतील असे अनुभव घेत तेच अनोखे, अस्पर्श असे गारुड आपल्या चितरुण लेखणीतून ते प्रकट करीत असतात. गंभीर गंमतीदार अशा ‘मत्तीर’ मधील त्यांच्या ह्या नव्या व्यामिश्र कथा रसिक वाचकांना नक्कीच भावतील
Reytinqlər və rəylər
5,0
1 rəy
5
4
3
2
1
Bu e-kitabı qiymətləndirin
Fikirlərinizi bizə deyin
Məlumat oxunur
Smartfonlar və planşetlər
Android və iPad/iPhone üçün Google Play Kitablar tətbiqini quraşdırın. Bu hesabınızla avtomatik sinxronlaşır və harada olmağınızdan asılı olmayaraq onlayn və oflayn rejimdə oxumanıza imkan yaradır.
Noutbuklar və kompüterlər
Kompüterinizin veb brauzerini istifadə etməklə Google Play'də alınmış audio kitabları dinləyə bilərsiniz.
eReader'lər və digər cihazlar
Kobo eReaders kimi e-mürəkkəb cihazlarında oxumaq üçün faylı endirməli və onu cihazınıza köçürməlisiniz. Faylları dəstəklənən eReader'lərə köçürmək üçün ətraflı Yardım Mərkəzi təlimatlarını izləyin.