किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, `कलेच्या क्षेत्रात यानं आपल्याला स्वर्ग भेटवला! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास?' "मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो!' कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस्. एल्. भौरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून!