MADHYARATRICHE PADGHAM

· MEHTA PUBLISHING HOUSE
४.३
२८ परीक्षण
ई-पुस्तक
148
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

‘तुम्ही पाहिलं असेल बघा त्यांना. ते हो - गुळगुळीत टक्कल. अगदी तुळतुळीत काळ्या गोट्यासारखा चेहरा! पोपटाच्या चोचीसारखं नाक! आणि डोळे... अगदी रोखून पाहणारे डोळे! मला तर त्यांच्या डोळयांची भीतीच वाटते......त्या दिवशी, रात्रीची गोष्ट. मी डॅडींच्या जवळ झोपलो होतो आणि एकदम मला जाग आली. सगळं घर हादरत होतं. झांजा वाजत होत्या. कोणीतरी पडघमवर ‘धम धम’ वाजवत होतं. त्याच ‘धम धम धम’ तालात सगळं घर हलत होतं. मग सगळं एकाएकी थांबलं. एक ‘गूंऽऽ’ असा भुंग्यासारखा आवाज यायला लागला. मग पुन्हा ‘धम धम’ वाजायला लागलं. मला फारच भीती वाटायला लागली. तेव्हा मी डॅडींना हलवून उठवायला लागलो... आणि एकदम लक्षात आलं: मी कुणाला हलवतोय? बिछान्यात आहेच कोण? बिछाना रिकामा - डॅडी जवळ नाहीतच. मी एकटाच! काळोख... आणि ‘धम धम’ वाजतंय. मी भयंकर घाबरून किंकाळी फोडली...’ ओळखीच्या - बिनओळखीच्या वातावरणांमध्ये उमटणारी अकल्पित भयाची ही वलये... गारठून टाकणारी... काल्पनिक असूनही अतिशय खरीखुरी. कदाचित कधीच प्रत्यक्ष न अनुभवलेली... तरीही मनात खोल कुठेतरी दडून बसलेली भीती... तिचे पडघम वाजू लागतील या कथा वाचताना. तो आवाज कान देऊन ऐका... तुमच्या मनात आजवर सीलबंद करून ठेवलेल्या त्या भीतीचा निचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपणच मनात दडवून ठेवलेल्या गूढाशी, अत्यंत तरलपणे आपली ओळख करून देणाऱ्या, एका श्रेष्ठ कथाकाराच्या, मंत्रमुग्ध करणाऱ्या कथांचा हा संग्रह. 

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.३
२८ परीक्षणे

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.