MADELEINE LENGLE WROTE HER FIRST STORY AT AGE FIVE AND BEGAN KEEPING A JOURNAL AT AGE EIGHT. THESE EARLY LITERARY ATTEMPTS DID NOT TRANSLATE INTO ACADEMIC SUCCESS. LENGLE DETERMINED TO GIVE UP WRITING ON HER 40TH BIRTHDAY WHEN SHE RECEIVED YET ANOTHER REJECTION NOTICE. BUT HER PASSION TOWARDS WRITING DIDN'T STOP THERE, SHE HAD CONTINUED TO WORK ON FICTION SUBCONSCIOUSLY. SHE COMPLETED HER FIRST NOVEL A WRINKLE IN TIME BY 1960. IT WAS REJECTED MORE THAN THIRTY TIMES BEFORE SHE HANDED IT TO JOHN C. FARRAR; IT WAS FINALLY PUBLISHED BY FARRAR, STRAUS AND GIROUX IN 1962. THIS FIRST NOVEL RECEIVED THE PRESTIGIOUS NEW BERRY MEDAL & THEN LENGLE CONTINUED WITH FOUR NEW NOVELS IN THE TIME QUINTENT SERIES.
मॅडेलिन लेन्गल हे अमेरिकन कुमार साहित्यातील अग्रणी नाव. त्यांचं साहित्य ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आणि आधुनिक विज्ञानाच्या अनोख्या मिलाफासाठी ओळखलं जातं. लेन्गल यांनी वयाच्या पाचव्या वर्षी पहिली कथा लिहिली. पण साहित्य क्षेत्रात स्थिरावण्यासाठी त्यांना बराच मोठा काळ जावा लागला. 1960 साली त्यांचं अ रिंकल इन टाइम या कादंबरीचं लेखन पूर्ण झालं. पण ही कादंबरी तीस प्रकाशकांनी नाकारली. अखेर 1962 साली ही कादंबरी प्रकाशित झाली.अ रिंकल इन टाइम,कादंबरी प्रकाशित होताच मॅडेलिन लेन्गल यांचं नाव प्रकाशझोतात आलं. या कादंबरीनं अमेरिकेतील प्रतिष्ठेचं न्यूबेरी मेडल पटकावलंच, शिवाय त्या वर्षीचे SEQUOYAH BOOK AWARD आणि LEWIS CARROLL SHELF AWARD हे पुरस्कारही पटकावले. या पहिल्या कादंबरीनंतर लेन्गल यांनी TIME QUINTET या मालिकेत पुढील अ विंड इन द डोअर, अ स्विफ्टली टिल्टिंग प्लॅनेट, मेनी वॅटर्स आणि अन अक्सेप्टेबल टाइम या कादंबऱ्या लिहिल्या. अ रिंकल इन टाइम या कादंबरीवर आधारित सिनेमाही विशेष गाजला.
Mugdha Gokhale is a science post graduate, but she has special interest in art & literature. She has done many translations including The Time Quintent Series by Madeleine L’engle.
मुग्धा गोखले या विज्ञान शाखेतील उच्च पदवीधर आहेत. पण त्यांना कला आणि साहित्य विषयात विशेष रूची आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक पुस्तके अनुवादित केली असून यात मॅडेलिन लेन्गल यांच्या टाइम पंचकडी मालिकेचाही समावेश आहे.