जसा, फुलांचा राजा गुलाब, जंगलाचा राजा सिंह तसंच तुम्हीदेखील जनमानसात लीडर म्हणून उदयास यावे, अशी तुमची इच्छा असेल तर हे पुस्तक निश्चितच तुम्हाला मार्गदर्शन करेल. महात्मा गांधींपासून ते अब्दुल कलाम यांच्यासारख्या महान विभूतींनीही संपूर्ण जगावर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. या पुस्तकातील 7 स्तंभ, तुमच्यातील गुणांचा पाया मजबूत बनवून तुम्हाला लीडरशिपच्या मार्गावर घेऊन जातील.
या पुस्तकात वाचा :
* लीडरमधील सर्वाधिक 7 प्रमुख गुणांना आधार (स्तंभ) कसे बनवाल
* लोकांसाठी प्रेरणास्रोत कसे बनाल
* आत्मविश्वास वृद्धिंगत कसे कराल
* नकारात्मक स्थितींना माइल स्टोन कसे बनवाल
* स्वामी विवेकानंदांप्रमाणे हृदयाकडून मार्गदर्शन कसे प्राप्त कराल
* महान लीडरची भूमिका कशी पार पाडाल
* व्य्नितगत ध्येयापासून वर उठून, अव्यक्तिगत, दमदार उद्दिष्ट कसे प्राप्त कराल
लक्षात ठेवा, लीडर बनण्यासाठी सर्वांत मोठी गुंतवणूक म्हणजे स्वतःला वेळ देणे होय, ज्यायोगे तुमच्यात दडलेला लीडर प्रकट व्हावा.