हिमालयीन पर्वतांच्या उंच भिंती असलेल्या एका दूरवरच्या तिबेटियन दरीत स्वपनातीत असा शांग्रि-लाचा मठ आहे. भारतातून अपहरण करून आणलेलं विमान कोसळल्यावर, ह्यूज कॉन्वेला त्या शांग्रि-लाच्या मठात आणलं जातं. तिथे त्याला काहीतरी गूढपणा जाणवतो.
हे उड्डाण कोणी नियोजित केलं होतं? असं कोणतं रहस्य होतं जे त्या आदरणीय लामाने दडवून ठेवलं होतं? फियानोसारखं वाद्य वाजवणारी ती सुंदर चिनी मुलगी ह्या अशा विचित्र जागी कशी आली?
हळूहळू कॉन्वेला ते असंभवनीय सत्य कळतं...