चार भिंतींबाहेरची प्रत्येक प्रभात ही असाच नवा जोम, नवे चैतन्य घेऊन उगवत असली पाहिजे. याच कल्याणप्रद घटकेला पाखरांना गाणे स्फुरते, कळीचे उमलून फूल होते आणि वृक्षांना नवे धुमारे फुटतात.... आजवर मानवजातीच्या कल्याणाचे जे-जे म्हणून विचार विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सुचले, उच्चारले, गाईले किंवा लिहिले गेले, तेही अशाच वेळी स्फुरले असावेत.......अशाच एका मनस्वी कलाकाराचे आपल्या तारुण्यातील ‘कोवळे दिवस’.