भयावह ग्रंथ आपणास आवडतात का? "ईन्फर्नो"- आपणास मृत्यूची भिती दाखवितो !"
"ईन्फर्नो- चित्रकला दालन"- "डिनो दि डुरान्ते" च्या मार्फत, हि संपूर्ण रंगीत पुस्तिका ७२ चित्रकृती चे संग्रह आहे व ति डांतेच्या 'ईन्फर्नो' या कथेवर आधारित आहे. या महान कलाकृती मधील प्रथम अध्याय डांतेच्या 'डिवाईन कॉमेडी' तील असून, त्यानंतर येणारी द्वितीय महान 'ईसाई कथा' 'द गॉसपेल' होय. डिनो दि डुरान्ते यांनी ईन्फर्नो ला संपूर्णतः नवे, सखोल आणि आकर्षक आयाम बहाल केले आहेत, त्यांनी या महान सहित्यकृतीचे ३० वर्षाहून अधिक काळासाठी अध्ययन केले आहे.
का खरेदी करावा हा ग्रंथ?
"डांते यांची अभिजात कलाकृती बहुसंख्य व विशेषतः नव तरुण रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी डिनो दि डुरांते यांनी आपले कलात्मक व व्यावसायिक आयुष्य संपूर्णपणे समर्पित केले आहे. डांते यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींमधील प्रासंगीकता आणि क्षमता याबद्दल गाढ विश्वास असणाऱ्या डुरांते यांनी व्यामीश्र विश्वातील समृद्धता समजवून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामुहिक सृजनशीलतेच्या माध्यमातून आपल्या कलात्मक प्रतिमांद्वारे या कथांना विस्तृत असा अवकाश बहाल केला आहे."
डॅा. डेनिस स्लॅटरे, पौराणीक अभ्यास, पॅसिफिका संस्था, कॅलिफोर्निया, अमेरिका
"डांते यांच्या काव्यतील अतिसूक्ष्म रंगछटा व 'डिवाईन कॉमेडी' चे सखोल ज्ञान यामुळे डिनो दि डोरांतो यांना स्वतः च्या चित्रकलेतील नरक संकल्पने चे सादरीकरणे सहज शक्य झाले. हि कलाकृती डांते च्या ईन्फर्नो चे उत्तम परिचय करून देत असतानाच, ती वाचकांना केवळ मध्य युगातील महान इटालियन महाकाव्यातील व्यक्तिरेखांशी नुसताच परिचय करून न देता, त्या अनुषंगे या कलाकृती ची संरचना व अभिवृत्ती चे स्पष्टीकरणही देते."
डॅा. ब्रिटने अस्रो, मध्ययुगीन व नवनिर्मिती युग अभ्यासिकेचे संचालक, युसीएलये - अमेरिका