श्रीमंत होण्यासाठी शेअर मार्केट ही एक गुरुकिल्ली आहे. या व्यापारामध्ये अनिश्चित परिपूर्णता आहे. पण बाजाराच्या सखोल अभ्यासानुसार ही अनिश्चितता आपण संधीमध्ये बदलू शकतो. डॉ. अनिल गांधी याचे ‘गुंतवणुकीची कामधेनू’ हे पुस्तक आपल्याला कमी जोखीमीसह गुंतवणुकीचा मार्ग दाखवते.
Dr. Anil G. Gandhi is a M.S. (General Surgeon), practicing surgeon from 1965 till date. He has written 10 books in Marathi& 2 in English. He is constantly contributing in print media like Makarashtra times, Loksatta & Sakal & known for his writing based on medical field.
डॉ. अनिल गांधी यांचा जन्म १९३९ मध्ये माढा (सोलापूर) येथे झाला. त्यांनी १९६३ला एम.बी.बी.एस. झाल्यानंतर पुण्यामध्ये फॅमिली फिजिशियन म्हणून पाच वर्षें प्रॅक्टिस केली. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरला. १९७१ला ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलमधून एम.एस. झाले. त्यांच्या मना सर्जना या आत्मकथनपर लेखनाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. धन्वंतरी घरोघरी, विचारी मना, शोध मनाचा, संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची या पुस्तकाचा उल्लेखनीय पुस्तक म्हणून विज्ञान परिषद मुंबईने गौरविले. या कातरवेळी – आनंदी वृद्धत्वाकडे वाटचाल आणि त्याचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर एकाचवेळी प्रसिद्ध झाले. कालनिर्णय आरोग्य २०१७ मध्ये संजीवनी उच्च तंत्रज्ञानाची प्रदिर्घ लेख छापून आला आहे.