Dhyanache Dnyan Vichar Niyam (Marathi)

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4.4
33 கருத்துகள்
மின்புத்தகம்
64
பக்கங்கள்
ரேட்டிங்குகளும் கருத்துகளும் சரிபார்க்கப்படுவதில்லை மேலும் அறிக

இந்த மின்புத்தகத்தைப் பற்றி

ध्यानाचे ध्यान विचार नियम

काही वेळ डोळे बंद करा, सजगतेने जगण्यासाठी…
दररोज रात्री आपण सर्वजण डोळे बंद करतो. पण त्यामागे आपल्याला गाढ झोप लागावी, हाच मुख्य उद्देश असतो. आता मात्र तुम्हाला दिवसातील काही वेळ डोळे मिटायचे आहेत ते, सजगतेने जगण्यासाठी! अर्थातच आंतरिक सजगता प्राप्त करण्यासाठी… हाच ध्यानाचा मुख्य उद्देश आहे. प्रस्तुत पुस्तकात ध्यानासंबंधी काही महत्त्वाचे पैलू समाविष्ट करण्यात आले आहेत :
1) ध्यानाद्वारे मनाला प्रशिक्षित कसं कराल?
2) ध्यानात साहाय्यक ठरणाऱ्या मित्रांना तुम्ही भेटू इच्छिता का?
3) ध्यानात बाधा निर्माण करणाऱ्या शत्रूंवर विजय प्राप्त करण्याची तुमची इच्छा आहे का?
4) ध्यान करताना मनातील विचारांचं काहूर थांबावं, असं तुम्हाला वाटतं का?
5) ध्यान का, कधी आणि कशा प्रकारे करावं?
6) “ध्यान’ आणि “विचार नियम’ यांविषयी जाणून तुमचे अंतर्चक्षू उघडण्याची तुमची इच्छा आहे का? तुमचं उत्तर जर “हो’ असेल, तर प्रस्तुत पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. कारण यात ध्यानाची सुरुवात करणाऱ्यांपासून ते नियमितपणे ध्यान करणाऱ्या साधकांसाठीदेखील मार्गदर्शन उपलब्ध आहे. ध्यानाच्या या प्रवासासाठी आपल्याला शुभेच्छा!

மதிப்பீடுகளும் மதிப்புரைகளும்

4.4
33 கருத்துகள்

ஆசிரியர் குறிப்பு

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

இந்த மின்புத்தகத்தை மதிப்பிடுங்கள்

உங்கள் கருத்தைப் பகிரவும்.

படிப்பது குறித்த தகவல்

ஸ்மார்ட்ஃபோன்கள் மற்றும் டேப்லெட்கள்
Android மற்றும் iPad/iPhoneக்கான Google Play புக்ஸ் ஆப்ஸை நிறுவும். இது தானாகவே உங்கள் கணக்குடன் ஒத்திசைக்கும் மற்றும் எங்கிருந்தாலும் ஆன்லைனில் அல்லது ஆஃப்லைனில் படிக்க அனுமதிக்கும்.
லேப்டாப்கள் மற்றும் கம்ப்யூட்டர்கள்
Google Playயில் வாங்கிய ஆடியோ புத்தகங்களை உங்கள் கம்ப்யூட்டரின் வலை உலாவியில் கேட்கலாம்.
மின்வாசிப்பு சாதனங்கள் மற்றும் பிற சாதனங்கள்
Kobo இ-ரீடர்கள் போன்ற இ-இங்க் சாதனங்களில் படிக்க, ஃபைலைப் பதிவிறக்கி உங்கள் சாதனத்திற்கு மாற்றவும். ஆதரிக்கப்படும் இ-ரீடர்களுக்கு ஃபைல்களை மாற்ற, உதவி மையத்தின் விரிவான வழிமுறைகளைப் பின்பற்றவும்.