करण थापर हे इंग्लंडमधील लंडन वीकेंड टेलिव्हिजन या दूरचित्रवाणी वाहिनीमध्ये दहा वर्षं कार्यरत होते. वीकेंड वर्ल्ड, द वर्ल्ड धीस वीक, द बिझनेस प्रोग्रॅम, द वाल्डेन इंटरव्ह्यू हे त्यांचे काही प्रसिद्ध कार्यक्रम. १९९१मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी आयविटनेस (चलचित्र आणि दूरदर्शन), हार्डटॉक इंडिया (बीबीसी), डेव्हिल्स अॅडव्होकेट (सीएनएन-आयबीएन) आणि टू द पॉइंट (इंडिया टुडे) यांसारख्या अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. सध्या ते इन्फोटेन्मेंट टेलिव्हिजन (आयटीव्ही)चे अध्यक्ष आहेत. ते हिंदुस्तान टाइम्समध्ये ‘संडे सेंटिमेंट्स’ हे साप्ताहिक सदर आणि बिझनेस स्टँडर्डमध्ये ‘अॅज आय सी इट’ हे पाक्षिक सदर लिहितात. करण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.