अफगाणिस्तानात वर्षानुवर्षं चाललेल्या युद्धामुळे तिथलं राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवन ढवळून निघालं आहे. तिथल्या नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी लढाई लढावी लागते आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर तेथील स्त्रियांवर खूप बंधनं लादण्यात आली. मुलींच्या शाळेत जाण्यावर बंदी आली. मुलींच्या शाळाच बंद पाडल्या गेल्या. स्त्रियांना नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आणि कपड्यांवर, सार्वजनिक वावरावर जुनाट बंधनं लादली गेली. नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करून तालिबानी सत्ता संपुष्टात आणली, तरी सर्वसामान्य लोकांच्या आणि स्त्रियांच्या जीवनात काहीच फरक पडला नाही. स्त्रियांचं स्थान दुय्यमच राहिलं. अशा विपरीत परिस्थितीतही परवानासारखी मुलगी शिक्षणाची, फ्रान्सला जाण्याची- स्वातंत्र्यपूर्ण भरारीची स्वप्ने पाहते. अर्थातच त्यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागतो. संकटात सापडलेल्या स्त्रियांना/ मुलींना आधार देणाऱ्या वीरा मौसीच्या आधारावर ती या स्फोटक परिस्थितीतून कशी बाहेर पडते याचं चित्रण केलं आहे ‘माय नेम इज परवाना’ या पुस्तकात.
DEBORAH ELLIS
is an award-winning author, a feminist and a peace activist. Deborah penned the international bestseller The Breadwinner, as well as many challenging and beautiful works of fiction and non-fiction about children all over the world. Her most recent book is Sit, which tells the stories of nine children and the situations they find themselves in, often through no fault of their own. In each story, a child makes a decision and takes action, be that a tiny gesture or a life-altering choice.
Deb has more than thirty books to her credit. She has won the Governor General’s Literary Award, the Ruth Schwartz Award, the Middle East Book Award, Sweden’s Peter Pan Prize, the Jane Addams Children’s Book Award and the Vicky Metcalf Award for a Body of Work. She has received the Ontario Library Association’s President’s Award for Exceptional Achievement, and she has been named to the Order of Canada. In 2017, The Breadwinner debuted as a feature animated film.
Deborah is a passionate advocate for the disenfranchised. She “walks the talk,” donating most of her royalty income to worthy causes — Canadian Women for Women in Afghanistan, Street Kids International, the Children in Crisis Fund of IBBY (International Board on Books for Young People) and UNICEF. She has donated more than one million dollars in royalties from her Breadwinner books alone.
अविकसित, गरीब, मागास राष्ट्रांतल्या मुलांचं खडतर जगणं विकसित देशातल्या माणसांसमोर ठेवणारी एक अत्यंत संवेदनशील लेखिका. तिच्या अत्यंत धाडसी अनुभवांना तिनं तितक्याच रोमांचकारी शैलीत वाचकांसमोर मांडलं.
जगभरातल्या सत्तासंघर्षात भरडल्या जाणाऱ्या अबोध, निरागस मुलांची वाताहत हाच तिच्या लेखनाचा केंद्रिंबदू आहे. तिच्या सगळ्याच पुस्तकांना देशविदेशांतून पुरस्कार मिळाले आहेत.
गव्हर्नर जनरलचा प्रतिाqष्ठत पुरस्कार, स्वीडनचा ‘पीटर पॅन पुरस्कार’, ‘द रूथ स्वाटर्झ पुरस्कार’, कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ‘मिडल ईस्ट बुक अॅवॉर्ड’, ‘द जेन अॅडम्स बालसाहित्य पुरस्कार’, ‘विकी मेटकाल्फ पुरस्कार’ अशा बऱ्याच प्रतिाqष्ठत पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आलं आहे.
जगभरात तिची ‘ब्रेडविनर’ ही ट्रायॉलॉजी खूप गाजली. जगभरातल्या सतरा भाषांमध्ये तिची ही पुस्तकं अनुवादित झाली आहेत. जगभरातल्या वाचकांनी या पुस्तकांना भरभरून प्रतिसाद दिला. तिला रॉयल्टी म्हणून मिळालेल्या रकमेतून लक्षावधी डॉलर्स ‘स्ट्रीट किड्स इंटरनॅशनल’ आणि ‘वुमन फॉर वुमन’ या संस्थांना दान देण्यात आले आहेत. ‘वुमन फॉर वुमन’ ही संस्था अफगाणिस्तानातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या आणि निर्वासितांचं आयुष्य जगणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करते.
डेबोरा एलिस ही ओन्टारिओ इथं राहते. स्त्री-मुक्तीवादी कार्यकर्ती म्हणून आणि शांतता मोहिमेअंतर्गत तिनं जगभरातल्या देशांत काम केलं आहे.
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहात फीचर एडिटर म्हणून कार्यरत असणाऱ्या अपर्णा वेलणकर मराठीतल्या आघाडीच्या लेखिका आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत.
‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या अरुंधती रॉय यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेल्या अपर्णा वेलणकर यांचे अनुवादकौशल्य त्यातील अस्सलतेमुळे सातत्याने वाखाणले गेले आहे. शोभा डे या आंतराराष्ट्रीय ख्यातिप्राप्त लेखिकेला तिच्या मराठी मुळांशी जोडणारे वाचकप्रिय अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केले आहेत.
ग्रेगरी डेव्हिड रॉबटर्स यांचे ‘शांताराम’ आणि नंदन निलेकणी यांचे ‘इमॅजिनिंग इंडिया’ ही त्यांनी मराठीत आणलेली आणखी दोन महत्त्वाची पुस्तके. युद्धग्रस्त अफगाणिस्तानातले उद्ध्वस्त बालपण नशिबी आलेल्या मुलांची फरपट चितारणाऱ्या डेबोरा एलीस यांच्या ‘ब्रेडविनर’ या मालिकेतील पहिली तीन पुस्तकेही त्यांनी अनुवादित केली आहेत.
१९६०च्या दशकात महासागर ओलांडून उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांच्या संघर्षाच्या पाऊलखुणा शोधणारे ‘फॉर हिअर, ऑर टू गो?’ हे अपर्णा वेलणकर यांचे पहिले स्वतंत्र पुस्तक अमेरिकेतील सिएटल येथे प्रसिद्ध झाले. गेल्या बारा वर्षांत या पुस्तकाच्या नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
संशोधन आणि लेखनाच्या निमित्ताने उत्तर अमेरिका आणि युरोपसह विविध देशांमध्ये विपुल प्रवास आणि वास्तव्य केलेल्या अपर्णा वेलणकर दोन लक्ष प्रतींचा विक्रमी खप गाठणाNया ‘दीपोत्सव’ या ‘लोकमत’ समूहाच्या दिवाळी अंकाच्या संपादक आहेत.