CHATRAPATI SAMBHAJI : EK CHIKITSA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.4
리뷰 91개
eBook
156
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

 Chhatrapati Sambhaji Maharaj the great Maratha warrior… a much controversial historical figure… Who is the initiator of this injustice…? Litterateurs? Historians? Bakharkars? Why did the dispute start on Raigad? Why did Sambhaji Raje join Dilerkhan? How true is Vasant Kanetkar’s analysis? It the ‘Godavari’ incidence true? What is Queen Soyara’s role in portraying Sambhaji’s character? Why did Sambhaji Raje punish his Ministers? Was Sambhaji Raje responsible for losing Hindvi Swaraj or was he the saviour? How did Sambhaji Raje face his death? The great senior historian of Maharashtra, Dr. Jayasingrao Pawar has analysed many such questions related to Sambhaji Raje.

छत्रपती संभाजी हा एक रंगेल, बेजबाबदार, व्रूâर राजा (युवराज) होता, असं चित्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमुळे निर्माण झालं; पण त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचं काम इतिहासकारांनी केलं नाही. परिणामी, संभाजीराजांची मलीन प्रतिमा साहित्यिक, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली; पण काही मोजक्या इतिहास संशोधकांनी योग्य कागदपत्रांचा शोध घेऊन, उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणारी कागदपत्रं, संशोधकांनी त्याची केलेली चिकित्सा आणि संभाजीराजांचे गुणविशेष अधोरेखित करणारी कागदपत्रं, यांचा सम्यक आढावा घेणारं पुस्तक म्हणजे...‘छत्रपती संभाजी : एक चिकित्सा.’संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणाNया विविध ऐतिहासिक साधनांचा आढावा या पुस्तकातून घेतला गेला आहे. संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले होते. त्याचं कारण काही ऐतिहासिक कागदपत्रांत असं सांगितलं गेलं आहे, की एका ब्राह्मणकन्येवर संभाजीराजे फिदा झाले होते. तिच्याशी त्यांचे अनैतिक संबंध होते. शिवाजी महाराजांना हे समजल्यावर ते संतापले. आता ते आपल्याला कडक शिक्षा देतील असं संभाजीराजांना वाटलं. म्हणून ते मोगलांना जाऊन मिळाले. काहींच्या मते रायगडावर हळदी-वुंâकवासाठी आलेल्या एका ब्राह्मण युवतीवर संभाजीराजांनी बलात्कार केला. त्याबद्दल शिवाजी महाराज त्यांना कडक शासन करतील या भीतीने ते मोगलांना जाऊन मिळाले.  आपली चूक उमगल्यावर ते स्वराज्यात परत आले. त्यांची आणि शिवाजी महाराजांची दिलजमाई झाली; पण संभाजीराजे मोगलांकडून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या भेटीचंही काही इतिहासकारांनी विपर्यस्त वर्णन केलं. त्यानंतर थोड्याच अवधीत शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. संभाजीराजांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला, असाही एक आरोप संभाजीराजांवर केला गेलेला काही कागदपत्रांत आढळतो.

평점 및 리뷰

4.4
리뷰 91개

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.