ब्रायन ट्रेसी हे ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रेरणादायी विचार मांडणारे प्रसिद्ध वक्ते या भूमिकेतून ते दर वर्षी साधारण अडीच लाख लोकांसमोर भाषण देतात. ऐंशीहून अधिक बेस्टसेलिंग पुस्तकांचे ते लेखक असून, बाराहून अधिक भाषांत या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत. जगातील ७५पेक्षा अधिक देशांतील एक हजाराहून अधिक कंपन्यांमध्ये आणि दहा हजारांपेक्षा अधिक मध्यम आस्थापनांमध्ये त्यांनी सल्लागार व प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे.