पहाटेचा अंधार होता. काळ्या, बर्फासारख्या गुळगुळीत आणि पंचावन्न डिग्री तपमानाच्या पाण्यात लिन होती. वादळ येण्यापूर्वी असतो तसा समुद्र ऊर्जेनं भारला गेला होता. तिला जाणीव झाली, की आपल्याबरोबर कुणीतरी पोहत आहे. कुणातरी ’मोठ्या’पासून वाचण्यासाठी अँकोव्हीची हजारो पिल्लं ठिणग्यांसारखी सैरावैरा उडत होती. ते जे काही होतं, ते तिला पांढर्या शार्कइतकं मोठं वाटत होतं...