Adarsh Jivanasathi Vichar Niyam (Marathi)

· WOW PUBLISHINGS PVT LTD
4,5
8 mnenj
E-knjiga
64
Strani
Ocene in mnenja niso preverjeni. Več o tem

O tej e-knjigi

आदर्श जीवनासाठी विचार नियम
नींव नाइन्टी (90%) + टॉप टेन (10%)+
दडलेलं शून्य (0) = 100% आदर्श जीवन

आधुनिक काळात एक “सुखी, सफल आणि आदर्श जीवन’ जगणं ही स्वप्नवत कल्पना वाटते. पण हे स्वप्न निश्चितच वास्तवात बदलू शकतं. त्यासाठी निसर्गाचे अटळ विचार नियम जाणून ते जीवनात अंगीकारायला हवेत. प्रस्तुत पुस्तक आपल्याला हीच कला शिकवतं. या पुस्तकाद्वारे जाणून घ्या –
– विचार नियम अंगीकारून यशप्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या आदर्श गुणांचा (विश्वासार्हता, परिपक्वता, निरंतरता इत्यादींचा) विकास कसा करावा?
– आपल्या विकासासाठी योग्य संघाची निवड का आणि कशी करावी?
– आपल्या जीवनात टॉप टेनची (बाह्य व्यक्तिमत्त्वाची) नेमकी भूमिका काय? त्याचा योग्य लाभ कसा घ्यावा?
– अनुभवातून जाणल्यानंतर ज्यायोगे आपण जीवनात सर्वोच्च ध्येय प्राप्त करू शकतो, ते अंतर्यामी दडलेलं “शून्य’ म्हणजे काय? ही रहस्यं जाणून, आपलं जीवन सुखी, यशस्वी आणि आदर्श बनवूया.

Ocene in mnenja

4,5
8 mnenj

O avtorju

सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).

सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.

सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.

Ocenite to e-knjigo

Povejte nam svoje mnenje.

Informacije o branju

Pametni telefoni in tablični računalniki
Namestite aplikacijo Knjige Google Play za Android in iPad/iPhone. Samodejno se sinhronizira z računom in kjer koli omogoča branje s povezavo ali brez nje.
Prenosni in namizni računalniki
Poslušate lahko zvočne knjige, ki ste jih kupili v Googlu Play v brskalniku računalnika.
Bralniki e-knjig in druge naprave
Če želite brati v napravah, ki imajo zaslone z e-črnilom, kot so e-bralniki Kobo, morate prenesti datoteko in jo kopirati v napravo. Podrobna navodila za prenos datotek v podprte bralnike e-knjig najdete v centru za pomoč.