मुकुंद आणि सुनंदाची भेट झाली ‘संततिनियमन करावे की नाही?’ या परिसंवादाच्या निमित्ताने. मग त्यांचं लग्न होतं. त्यांच्या संसारवेलीवर अरुणच्या रूपाने गोंडस फूल उमलतं. अरुणच्या जन्मानंतर मुकुंद मूल न होण्याची शस्त्रक्रिया करून घेतो; पण सुनंदाला पुन्हा दिवस गेले असल्याची चाहूल लागते आणि मुकुंदा हैराण होतो. सुनंदाच्या चारित्र्यावर शंका उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण होते. त्याचा पुण्यात बदलून आलेला मावसभाऊ गोविंदा त्याच्या अनुपस्थितीत सुनंदाशी गप्पा मारायला येत असल्याचं, त्याच्या लक्षात आलेलं असतं. गोविंदाला खरं म्हणजे सुनंदाशी लग्न करायचं असतं; परंतु मुकुंदाने तिला मागणी घातल्यावर आपला विचार बदलून गोविंदा दुसर्या गावी निघून गेलेला असतो. मुकुंदाने सुनंदाला मागणी घालण्यापूर्वी तिलाही तो पसंत होता, असं सुनंदाने म्हटल्याचं मुकुंदाला आठवत असतं. त्यांच्या सुखी संसारात संशयासुराने प्रवेश केलेला असतो... काय होतं पुढे? मुकुंद आणि सुनंदाच्या भावांदोलनांची कहाणी.
"B.D.KHER, WHO AUTHORED ABOUT 117 BOOKS DURING HIS LIFE TIME, WROTE HIS FIRST BOOK IN 1939. KHER LEFT MARATHI DAILY KESARI AS AN ASSOCIATE EDITOR AFTER 22 YEARS OF SERVICE. LATER, HE JOINED SAHYADRI AS THE EDITOR AND STAYED IN THAT POSITION FOR 10 YEARS. IN 1976, A JAPANESE FOUNDATION HAD INVITED HIM TO WRITE A NOVEL ON THE HIROSHIMA BOMBING INCIDENT. KHER RECEIVED AWARDS FOR HIS NOVELS LIKE ANANDBHAVAN, HASRE DUKKHA, HIROSHIMA, SAMAGRA LOKMANYA TILAK ETC. HE AUTHORED V D SAVARKARS BIOGRAPHY YADNYA. "
"भा.द. खेर यांचा जन्म अहमदनगरमधील कर्जत येथे झाला. ते वीस वर्षे दैनिक केसरीचे सहसंपादक आणि दहा वर्षे सह्याद्रीचे संपादक होते. समग्र टिळक व सावरकर साहित्य, यांचेही त्यांनी संपादन केले. आजवर त्यांची जवळपास शंभर लहान-मोठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चरित्रात्मक कादंबरी हा वाङ्मयप्रकार त्यांनीच प्रथम मराठीत आणला. त्यापैकी सावरकरांवरील यज्ञ, चाफेकर बंधूंवरील क्रांतिफुले, महाभारतावरील कल्पवृक्ष, झाशीच्या राणीवरील समर सौदामिनी, चार्ली चॅप्लिनवरील हसरे दु:ख, श्रीकृष्णावरील सारथी सर्वांचा या कादंबऱ्या विशेष गाजल्या. तसेच जपानमधील अणुसंहारावरील हिरोशिमा ही कादंबरीही गाजली. याशिवाय दि प्रिन्सेस, वादळवारा, अधांतरी ही भाषांतरित पुस्तकेही लोकप्रिय ठरली. त्यांनी पन्नास वर्षे अव्याहत लेखन केले. पुरस्कार : • आनंदभवन कादंबरीला १९७४ चे सोव्हिएत लॅन्ड नेहरू अॅवॉर्ड. • हिरोशिमाला १९८४ चे सोव्हिएत लॅन्ड नेहरू अॅवॉर्ड. • हिरोशिमाला १९८४ चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार. • हसरे दु:खला १९९३ चा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार."