तो आणि ती...त्यांच्या प्रेमाची ही दुखरी गझल आहे, उजाड माळरानावरची दर्दभरी कविताच जणू. या प्रेमकहाणीत सूर आहेत, संगीत आहे, मोगऱ्याचा सुगंध आहे, पण या साऱ्यामधून भळभळून वाहते आहे फक्त तलखी...शरीर, मन आणि त्याहीपलीकडच्या साऱ्या जाणिवानेणिवांना सतत ठसठसत ठेवणारी तलखी... ऐका सुहास शिरवळकरलिखित कादंबरी 'तलखी' समीरा गुजर यांच्या आवाजात!