हसत राहण्याचा मंत्र देणारं पुस्तक म्हणजे 'हसवणूक'. आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांनी शाब्दिक विनोदाची पखरण करत दिवस आनंदात घालवण्याचं जणू तंत्रच आपल्याला शिकवलं आहे. 'माझे खाद्यजीवन' सारख्या लेखातला पुलंचा खळाळता विनोद कुणालाही ताजंतवानं करतो. ऐका, 'माझे खाद्यजीवन' ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह!