'नटरंग' ही भारतीय कलाकाराची शोककथा आहे. तिला अनुभवाचे अनेक पदर आहेत. जीवनातील भयानक दारिद्र्य , संघर्ष आणि कलात्मक उर्जा, एखाद्या कलाकाराचे कुटुंब आणि कलाकाराची कला या व्यक्तिमत्त्वाचे एकसंध मिश्रण पाहायला मिळते. लेखकाने 'मातंग' समाजातील कलाकाराच्या जीवनशैलीचे आणि त्याच्या बाहेर जाऊन आत्मप्रेरणेने , कलानिर्मितीच्या आकांक्षेने जगू पाहणाऱ्या कलाविश्वाचे चित्रण केले आहे. चाकोरीबाहेर जाऊन निवडलेली कलावस्तू, निवेदनाचे साधेच परंतु आशयानुकूल आणि अर्थगर्भ स्वच्छ रूप, नेमक्या प्रतिमांच्या साह्याने खुलत जाणार्या प्रसंगांची दीप्ती, भोवतालच्या परिसराचे मूळ कथावस्तूशी निगडीत झालेले नाते आणि संपूर्ण आशयातून व्यक्त होत गेलेली मनाची स्पंदने ही कादंबरीची वैशिष्ठ्ये आहेत. ऐका "नटरंग" दर्शन बांगे यांच्या आवाजात .
Beletristika i književnost