काही माणसं सुख विकतात. पण ते जे सुख विकतात, त्याच सुखाचा उपभोग घेणं त्यांच्या नशिबात नसतं. नियतीच्या फेऱ्यात अडकलेला गुणा सणगर ह्यांच्यापैकीच एक. नियतीने आपल्याला ज्या सुखापासून वंचित केलं, ते सुख शेवटी तो दुसऱ्याच्या चेहऱ्यावर पाहून त्यात सुख मानतो.