ग्रामीण भागातल्या महिलांनी उद्योजक व्हावं, यासाठी माविमने अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळाने बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला. उद्योजक होण्यासाठी आवश्यक ती कौशल्यं शिकवणाऱ्या कार्यशाळा, मार्केटिंगचं तंत्र, आपल्या उत्पादनांसाठी नवं मार्केट कसं मिळवायचं इथपासून ते बॅंकेतल्या, सरकारी अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं इथपर्यंत अनेक गोष्टी या महिलांना शिकवल्या. महाराष्ट्रातल्या खेडोपाडी आज माविमचं नाव लाखो स्त्रियांच्या ओठांवर आहे, ते केवळ प्रशिक्षण आणि उद्योगासाठी मदत केली म्हणू नव्हे, तर कसलंही भांडवल नसताना मेहनत, जिद्द आणि शिकलेल्या कौशल्यातून आपणही उद्योजक होऊ शकतो, हा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केल्यामुळे. माविमसोबत शेकडो स्त्रियांनी केलेला उद्योजकतेचा हा डोलारा गेली अनेक वर्ष माविमच्या व्यवस्थापकीय संचालक कुसुम बाळसराफ यशस्वीपणे सांभाळत आहेत. ऐकुया बाळसराफ यांच्या नेतृत्वातली माविमची ही वाटचाल...