शेरलॉक होम्सच्या कथांचा अनुवाद करत असताना भालबा केळकरांच्या डोक्यात वॅटसन आणि शेरलॉकला घेऊन एक कथानक आलं आणि त्याच्या निरिक्षण आणि निष्कर्ष पध्दतीची थोड्या तिरकस शैलीत गंमत करत भालबांनी लिहिलेली कथा म्हणजे असाही एक शेरलॉक होम्स ! शेरल़ॉक होम्सचे मूळ लेखक सर ऑर्थर कॉनन डॉयल यांची माफी मागत त्यांनी ही कथा डॉयल यांच्या लेखनशैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.