या ॲपबद्दल थोडी माहिती
तुम्हाला WhatsApp बद्दल आवडत असलेले सर्व तसेच व्यवसायासाठी बिल्ट-इन टूल
WhatsApp Business हे तुम्हाला अधिक हुशारीने काम करण्यात, विश्वास निर्माण करण्यात आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यात मदत करणारी बिल्ट-इन टूल असलेले विनामूल्य डाउनलोड करता येणारे ॲप आहे.
तुम्हाला विनामूल्य कॉल* आणि विनामूल्य आंतरराष्ट्रीय मेसेजिंग* तसेच संभाषणांचा पुरेपूर फायदा घेण्यात मदत करण्यासाठी व्यवसाय फीचर मिळतात.
यासारखे व्यावसायिक लाभ मिळवण्यासाठी ॲप डाउनलोड करा:
हुशारीने काम करा. ॲपला तुमच्यासाठी काम करू देऊन वेळेची बचत करा! ग्राहकांना ऑटोमेटेड तात्काळ प्रत्युत्तरे आणि व्यस्तता संदेश पाठवा, जेणेकरून तुम्ही कधीही संधी गमावणार नाही. महत्त्वाची संभाषणे झटपट व्यवस्थापित करण्यासाठी, फिल्टर करण्यासाठी आणि शोधण्यासाठी लेबल वापरा. ऑफर किंवा बातमी शेअर करण्यासाठी स्टेटस तयार करा आणि उत्तम ग्राहक अनुभव तयार करण्यासाठी ॲपमध्ये ऑर्डर आणि पेमेंट** देखील घ्या.
नातेसंबंध आणि विश्वास निर्माण करा. एका सुरक्षित प्लॅटफॉर्मवर व्यावसायिक बिझनेस प्रोफाइलसह, तुम्ही ग्राहकांसोबत विश्वासार्हता आणि विश्वास निर्माण करता. अधिक प्रतिसादात्मक कस्टमर सपोर्ट देण्यासाठी आणि दीर्घकालीन निष्ठा निर्माण करण्यासाठी ॲप वापरा. तुमची सत्यता बळकट करण्यासाठी Meta Verified*** चे सदस्यत्व घ्या.
अधिक विक्री करा आणि प्रगती करा. शोधले जा, जाहिरात करा आणि अधिक मौल्यवान ग्राहक कनेक्शन बनवा. ग्राहकांना लक्ष्यीत ऑफर पाठवून विक्री वाढवा; क्लिक केल्यावर WhatsApp वर नेणाऱ्या जाहिराती तयार करा; तुमचे प्रॉडक्ट कॅटलॉग शोकेस करा; आणि ग्राहकांना ॲपमधील ऑर्डर आणि पेमेंटची सुविधा द्या.**
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सर्व फीचर विनामूल्य आहेत का?
ॲपमध्ये विनामूल्य आणि सशुल्क फीचर आहेत आणि ते विनामूल्य डाउनलोड केले व वापरले जाऊ शकते.
मला तरीही माझे वैयक्तिक WhatsApp वापरता येईल का?
होय! तुमच्याकडे दोन वेगवेगळे फोन नंबर असतील, तर तुमचा व्यवसाय आणि वैयक्तिक खाती एकाच डिव्हाइसवर एकत्र राहू शकतात.
मला माझे पूर्वीचे चॅट ट्रान्सफर करता येईल का?
होय. तुम्ही WhatsApp Business ॲप सेट केल्यावर, तुमचे मेसेज, मीडिया आणि संपर्क तुमच्या बिझनेस खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही तुमच्या WhatsApp खात्यातून बॅकअप रिस्टोअर करू शकता.
मला किती डिव्हाइस कनेक्ट करता येतील?
तुमच्या खात्यावर तुमच्याकडे एकूण पाच वेबवर आधारित डिव्हाइस किंवा मोबाइल फोन असू शकतात (तुम्ही Meta Verified*** चे सदस्यत्व घेतल्यास कमाल 10).
*डेटा शुल्क लागू होऊ शकते. तपशिलांसाठी तुमच्या प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
**सर्व मार्केटमध्ये उपलब्ध नाही
***लवकरच जागतिक स्तरावर उपलब्ध
या रोजी अपडेट केले
२१ जाने, २०२५